खेड : तालुक्यातील मौजे भरणेनाका येथे पोलिसांनी बेकायदेशीर दारूविरोधी कारवाई केली. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश दत्ताराम गमरे याच्याकडून ३५ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी सन्मान हॉटेलच्या पाठीमागे सापळा लावून आरोपीला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलिसांचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या मते, ही दारू कुठून आली आणि कुठे विकली जाणार होती याचा तपास सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:39 PM 22/Jan/2025












