खेड : तालुक्यातील सवेणी-लिंगायतवाडी येथे लागलेल्या वणव्यात बागायती जळून खाक झाली. यात बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. मात्र, घराकडे येणारा वणवा येथील न.प.च्या अग्निशमन दलातील कर्मचार्यांच्या तत्परतेने आटोक्यात आणण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.
सवेणी-लिंगायतवाडी येथे वणवा लागल्याची खबर मिळताच अग्निशमन दलातील फायरमन शाम देवळेकर, दीपक देवळेकर, सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणय रसाळ, प्रणव घाग, वाहनालक विद्याधर पवार तातडीने घटनास्थळी पोहाचले. वणव्याने रौद्ररूप धारण केल्याने बागायती भस्मसात झाल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:53 PM 22/Jan/2025













