खेड : खेड तालुक्यातील गुणदे वावळीवाडी येथे १७ जानेवारी रोजी सायंकाळी साडेतीन वाजता एक भीषण अपघात झाला. या अपघातात एक मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष चावु आंग्रे हे आपल्या मोटारसायकलवरून गुणंदे तांबडवाडी येथून जात होते. याच दरम्यान, गुणदे वावळीवाडी येथील स्टॉपच्या पुढील स्पिडब्रेकरजवळ एसटी बसने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात संतोष आंग्रे यांच्या ओठाला आणि मानेच्या पाठीमागील भागाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या मानेच्या मनक्याची चपटी फुटल्यामुळे ते कंबरपासून खालील भाग हलवू शकत नाहीत.
पोलिसांनी या प्रकरणी एसटी बसचा चालक हनुमंत विक्रम भावड याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या मते, आरोपी चालकाला रस्ता अरुंद असल्याची माहिती असूनही तो बस अतिवेगाने चालवत होता. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:38 PM 22/Jan/2025














