लांजा : ‘त्या’ चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांचे तपासचक्र सुरू

लांजा : सदनिकेचा मुख्य दरवाजा तोडून २ लाख ७१ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेला २४ तास उलटून गेले असून, पोलिसांचे तपासचक्र सुरू आहे.

दिवसाढवळ्या काही मिनिटांच्या कालावधीत झलेल्या धाडसी चोरीच्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या तपासकामी रॅम्बो नामक श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र, श्वान अर्ध्यावरच घुटमळल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्या दृष्टीने लांजा पोलस अधिक तपास करत आहेत. लांजा शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी रॉयल पार्क या इमारतीमध्ये ही घटना घडली होती. १ लाख २५ हजार रुपये किमतीचे कानातील रिंग, २.५ तोळे वजनाचे सोन्याच्या बांगड्या, ५ ग्रॅम वजनाचे कानातील रिंग, १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, सोन्याच्या दोन अंगठ्या असा एकूण २ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवजावर चोरट्याने डल्ला मारला. याबाबतची तक्रार देणारे रोहित नेवरेकर, रुहिदा नेवरेकर (५३) या घराला कुलूप लावून इमारतीमध्ये शेजारील नातेवाईकांकडे गेल्या होत्या. घरी परतण्याच्या काही मिनिटांत ही धाडसी चोरी झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:04 PM 01/Oct/2024