रत्नागिरीत आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

रत्नागिरी : हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आल्याचे शिवसेना शहर संघटक तथा युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद सावंत यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता रक्तदान शिबिर होणार आहे. सकाळी शिवसेना शाखा साळवी स्टॉप येथे तसेच मा. खासदार विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालय रत्नागिरी येथे बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येईल. त्यानंतर सकाळी १०.३० वा. जिल्हा रुग्णालयात फळवाटप करण्यात येणार आहे. दु. १.०० वा. माजी आ. राजन साळवी यांच्या संपर्क कार्यालयात सत्यनारायण महापुजेनिमित्त महाप्रसाद, सायंकाळी ४.०० वा. हळदीकुंकु समारंभ होणार आहे. सायं. ६.०० वा. भजनाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला शिवसेना, युवासेना, रिक्षा सेना, विधी सेना आणि महिला आघाडी यांच्यासह सर्व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उबाठा पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 23/Jan/2025