पाचल : राजापूर तालुक्यातील जि. प. आदर्श शाळा करक नं. १ शाळेतील उपशिक्षक सुभाष भाऊ चोपडे यांना २०२३-२४ चा नुकताच रत्नागिरी जिल्हा परिषेदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत व मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, शिक्षणाधिकारी कासार यांच्या हस्ते रत्नागिरी येथे प्रदान करण्यात आला.
सुभाष चोपडे यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक या कार्याच्या जोरावर त्यांनी समाजात वेगळे स्थान निर्माण केले आहे. उत्कृष्ट कवी, चारोळीकार, सिद्धहस्त लेखक, यशस्वी सूत्रसंचालक, प्रसिद्ध व्याख्याते आणि आदर्श शिक्षक म्हणून ते सर्वत्र परिचित आहेत. या पुरस्काराबद्दल सुभाष चोपडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 01/Oct/2024














