मुंबई : मुंबई : शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांची आज (२३ जानेवारी) जयंती असून, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून आदरांजली अर्पण केली जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शरद पवार यांनीही ट्विट केले आहे.
“प्रभावी व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध व्यंगचित्रांच्या माध्यमातून ‘मार्मिक’ भाष्य केले. कुशल संघटक व मुत्सद्दी राजकारणी असलेल्या बाळासाहेबांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी लढा दिला. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसांच्या स्वाभिमान जागृतीसाठी कायम प्रयत्नशील राहिलेले शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन”, अशी पोस्ट शरद पवारांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 23-01-2025











