Ind vs Ban, Breaking : भारताने बांगलादेशविरुद्धची कसोटी सिरीज २-० ने जिंकली

भारत आणि बांगलादेशमधील (India vs Bangladesh) दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने 7 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. पावसाने कसोटीत व्यत्यय आणल्याने सामना ड्रॉ होईल, अशी शक्यता होती.

मात्र चौथ्या दिवशी कसोटी सामन्यात टी-20 सारखी फलंदाजी करत टीम इंडियाने विजय जवळपास निश्चित केला. बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची ही मालिका टीम इंडियाने 2-0 अशा फरकाने जिंकली.

कानपूर येथे खेळवण्यात येणाऱ्या भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात 146 धावांवर सर्वबाद झाला. कसोटी मालिकेतील पाचव्या दिवसाच्या पहिल्याच सेशनमध्ये बांगलादेशचा संघ ढेपाळला. भारतीय संघाला दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी बांगलादेशने 95 धावांचं आव्हान दिलं. भारतीय संघाने हे आव्हान 17.2 षटकामध्ये पूर्ण करत विजय मिळवला.

बांगलादेशचा पहिला डाव कसा राहिला?

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताने आपला पहिला डाव 9 बाद 285 धावांवर घोषित केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचा पहिला डाव भारताने 233 धावांत गुंडाळला होता. भारताला पहिल्या डावात 52 धावांची आघाडी मिळाली.

भारताचा पहिला डाव कसा होता?

भारतीय संघाने सर्वांत वेगवान 50, 100 आणि 200 धावांचा विक्रम नोंदविला.भारताकडून यशस्वी जैस्वाल (72) आणि केएल राहुल (68) यांनी अर्धशतके झळकावली. विराट कोहली 47 धावा करून शकीब अल हसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 27 हजार धावाही पूर्ण केल्या. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने 4 आणि मेहदी हसन मिराजने 3 विकेट घेतल्या.

बांगलादेशच्या दुसऱ्या डावात काय घडलं?

कानपूर येथे खेळवण्यात येणाऱ्या भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात 146 धावांवर सर्वबाद झाला. कसोटी मालिकेतील पाचव्या दिवसाच्या पहिल्याच सेशनमध्ये बांगलादेशचा संघ ढेपाळला. भारताकडून दुसऱ्या डावात जडेजा, अश्विन आणि बुमराह यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले.

भारताने दुसऱ्या डावात काय केलं?

बांगलादेशने 95 धावांचं लक्ष्य दिल्यानंतर रोहित शर्माने 8 तर शुभमन गिल 6 धावा केल्या. यशस्वी जैस्वालने अर्धशतक झळकावले. यशस्वी जैस्वालने 45 चेंडूत 51 धावा केल्या. यशस्वी जैस्वालला विराट कोहलीने चांगली साथ देत 28 धावा केल्या. बांगलादेशकडून मेहंदी हसनने दोन विकेट्स घेतल्या. तर तैजूल इस्लामने एक विकेट घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:19 01-10-2024