चिपळूण : वाशिष्ठी नदीकिनारी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा

चिपळूण : शहरातील पेठमाप येथे २० जानेवारी रोजी सायंकाळी वाशिष्ठी नदीकिनारी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी बारा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस हेड कॉन्स्टेबल अजित कदम यांनी फिर्याद दाखल केली आहे.

शहरातील पेठमाप येथे वाशिष्ठी नदीकिनारी मैदानात बसून पैसे लावून पत्ते खेळताना दिसून आले. त्यांच्याकडून १ हजार १४० रूपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी नावेद फैसल शेख (२३), सलमान अब्दुल रज्जक अलवी, शरफुद्दीन, गुलाम महंमद लांडगे, अदिल फिरोज रुमानी, जाईद अफरोज परकार, आमीर मकबूल सुर्वे, दानिश असलम लांडगे आदींच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 23/Jan/2025