चिपळुणात मोफत निवासी बेकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

चिपळूण : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयातर्फे रत्नागिरीतील महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आणि महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत निवासी बेकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. त्यासाठी इच्छुकांनी २५ जानेवारीपर्यंत रत्नागिरी येथील आर. ए. गावडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बेकरीवर आधारित तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांमध्ये बेकरी उत्पादने, बेकरी कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक कौशल्य, बेकरीमधील विविध उद्योगसंधी, आदींबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले जाणार आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक व्यवस्थापन आणि कायदेशीर माहिती, मार्केटिंग कौशल्य, ग्राहकांशी संबंध तयार करून बाजारात व्यवसाय वाढवण्याचे तंत्र, शासनाच्या विविध योजना, बँकिंग प्रकल्प अहवाल, उद्योगात लागणारी कागदपत्रे, उद्योजकीय मानसिकता, उद्योजकीय गुणसंपदा आदी विषयांवर रोज १८ दिवस तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन होणार आहे. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश तरुणांना बेकरीवर आधारित तांत्रिक कौशल्य शिकवून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सक्षम बनवणे हा आहे. अमृत लक्षित गटातील पात्र लाभार्थ्यांची मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:07 PM 23/Jan/2025