रत्नागिरी : रजिस्टर कार्यालयात जमिनीच्या खरेदीखताची नोंद न करता २२ लाख ७२ हजार रुपये स्वीकारत फसवणूक केल्याप्रकरणातील संशयित वकिल महेश नलावडेचा न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. परंतु न्यायालयाने या प्रकरणात शहर पोलिसांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी वेळ दिला आहे.
सावकार निलेश कीरने अॅड. महेश नलावडेच्या मदतीने फिर्यादी संदीप मधुकर वेलोंडे (४५) यांच्याकडून २५ एकर जागेचे रोख २२ लाख ७२ हजार रुपये अॅड. महेश नलावडेच्या कार्यालयात घेतले. तेव्हा नलावडेने जमिनीचे खरेदीखत तयार करुन त्यावर दोघांच्याही सह्या घेतल्या. त्यानंतर निलेश कीर रोख रक्कम घेऊन फरार झाला तर अॅड. महेश नलावडेने खखरेदी खताची कागदपत्रे फिर्यादीच्या परवानगी शिवाय निलेश कीरकडे सुपूर्द केली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 24/Jan/2025











