रत्नागिरी : शहरानजीकच्या कुवारबाव गराटेवाडी येथे अज्ञात कारणातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना मंगळवार २१ जानेवारी रोजी रात्री ९.३० ते ११.४५ वा. सुमारास घडली असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार देण्यात आली असून ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद कांबळे (४५), कशीश कांबळे (३५, दोन्ही रा. लक्ष्मीकांतवाडी मिरजोळे, रत्नागिरी), समीर भाटकर आणि छब्या नामक व्यक्ती (दोन्ही रा. भाटकरवाडी, रत्नागिरी), शिवराम गराटे (५५), आदर्श गराटे (२५), अथर्व गराटे (२२) आणि एक महिला (२४, सर्व रा. कुवारबाव गराटेवाडी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आठ संशयितांची नावे आहेत. संशयितांमध्ये बुधवारी रात्री अज्ञात कारणातून वाद होऊन त्यांनी एकमेकांना लाकडी बांबू आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 24/Jan/2025









