‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा अंतिम आठवडा सुरू झाला आहे. या अंतिम टप्प्यापर्यंत अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळी हे सदस्य पोहोचले आहेत. यामधील निक्कीने तिकीट टू फिनालेचा टास्क जिंकून ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील ती पहिली फायनलिस्ट ठरली आहे.
सोमवारी ( ३० सप्टेंबर ) तिकीट टू फिनालेचा टास्क झाला. याआधी घरातील सात सदस्यांमध्ये बाबागाडीचा टास्क पार पडला. या टास्कमध्ये बाबागाडीवरून सदस्यांना घरात ठेवलेले झेंडे जमा करायचे होते. कमी वेळेत सर्वाधिक झेंडे जमा करून सूरज हा तिकीट टू फिनालेच्या टास्कसाठी निवडला गेला. त्याआधी निक्कीने म्युच्युअल फंडमधील कॉइनचा वापर करून थेट तिकीट टू फिनालेच्या टास्कमध्ये एन्ट्री केली होती. त्यामुळे सूरज विरुद्ध निक्की असा तिकीट टू फिनालेचा टास्क पाहायला मिळाला. यावेळी निक्की विजयी झाली आणि तिने तिकीट टू फिनाले जिंकलं. अशातच या ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या फायनलिस्टला अंकिताचा राग आला आहे. याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.
‘सिने मराठी’ या इन्स्टाग्राम पेजवर निक्कीचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये जेवणावरून निक्की अंकितावर रागवल्याचं पाहायला मिळत आहे. यासंदर्भात निक्की जान्हवीशी बोलताना दिसत आहे. ती जान्हवीला म्हणते, “तुला खरं सांगू, हे इतकं घाण दिसलेना. तिने इतकं मोठं फिल्प मारलंय ना. जेव्हा आर्याचं जेवण मी अडवलं होतं, तेव्हा सर मला ओरडले होते. यावेळेस तिने ( अंकिता ) स्टँड घेतला होता. जे बरोबर होतं. पण आज ती स्वतः त्या मुद्द्यावरून पलटली.” यावेळी जान्हवी म्हणाली, “तुझा मुद्दा बरोबर होता.”
पुढे निक्की म्हणाली, “अन्न न विचारण म्हणजे तिने अन्न बनवलं नाही. मग तिने कशाला नाश्ता करायची ड्युटी घेतली. तू सूरजबरोबरचा लगोरी टास्क हारून सांगाकाम्याच्या वेळी तू जेवण बनवलं आहेस. तू म्हटली असती ना मी नाही करत. पण तू तसं नाही केलंस. ही लय कुचकी आहे. ही एक नंबरची कुचकी आहे.”
दरम्यान, तिकीट टू फिनालेचा टास्क झाल्यानंतर ‘बिग बॉस’ने एक घोषणा केली ती म्हणजे मीड डे एविक्शनची. त्यामुळे आता येत्या दिवसांत अभिजीत, धनंजय, जान्हवी, सूरज, अंकिता आणि वर्षा उसगांवकरांपैकी कोणत्या सदस्याची अंतिम फेरीपर्यंत जाण्याची संधी हुकते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:48 01-10-2024