संगमेश्वर : ताम्हाने हायस्कूलमध्ये ‘फळ प्रक्रिया आणि रोजगार निर्मिती’वर मार्गदर्शन

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर, ताम्हाने प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांना ‘फळ प्रक्रिया आणि रोजगार निर्मिती’ या विषयांतर्गत मठधामापूरच्या उद्योजिका पूनम लिंगायत आणि पालघरचे ओमकार आंबवणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी फणस या फळाचे विविध उपयोग आणि विविध प्रक्रिया कशा करता येतात हे सांगण्यात आले तसेच मार्केटिंग साठी मीडियाचा वापर कसा करता येऊ शकतो, याचे देखील मार्गदर्शन केले. यामध्ये मुख्य विषय फणस आणि त्याच्यावर प्रक्रिया करून अटूळ पावडर, चिप्स, मॅगी असे अनेक पदार्थ कसे तयार करतात याचे मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर जैवविविधता कोकणातील किती उपयुक्त याचीही माहिती देण्यात आली. याला विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:20 PM 24/Jan/2025