दापोली : जालगाव ग्रामपंचायतीतर्फे आज सायकल व ई-बाईक फेरी

दापोली : तालुक्यातील जालगाव ग्रामपंचायतीच्यावतीने माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत आज (ता. २५) सकाळी ८ वा. सायकल व ई-बाईक फेरीचे आयोजन केल आहे.

माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत वायूप्रदूषण टाळण्यासाठी आणि वातावरणातील शुद्ध हवेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याकरिता प्रचार आणि प्रसाराच्या उद्देशाने पर्यावरण संवर्धनार्थ या फेरीचे आयोजन केले आहे, अशी माहिती या समितीचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी दिली. ही फेरी ग्रामपंचायत जालगाव येथून सकाळी ८ वा. सुरू होणार असून, जालगाव बर्वे आळी, पांगारवाडी, मरीआई
मंदिर नंतर लष्करवाडी, महालक्ष्मी मंदिरमार्गे ब्राह्मणवाडी-मिसाळवाडी मार्गे-बाजारपेठ जालगावमार्गे पुन्हा ग्रामपंचायत जालगाव या ठिकाणी या रॅलीचा समारोप होणार आहे. या रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन ग्रामपंचायत जालगावचे सरपंच अक्षय फाटक यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 AM 25/Jan/2025