चिपळुणात ४ व ५ ऑक्टोबरला ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव

चिपळूण : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असणाऱ्या बालरंगभूमी परिषद, मुंबई आयोजित आणि बालरंगभूमी परिषद शाखा, रत्नागिरी संयोजित चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात ४ व ५ ऑक्टोबर रोजी ‘जल्लोष लोककलेचा’ या महाराष्ट्रातील लोककलांवर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

रत्नागिरी शाखा संयोजक असलेल्या या कार्यक्रमात नृत्य, वादन व गायन अशा प्रकारात रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांच्या बालकलाकारांची स्पर्धा होणार असून, विजेत्यांना रोख रक्कम व अन्य पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शाखेचे अध्यक्ष नंदकिशोर जुवेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ४व ५ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात लोककलेचा जल्लोष सुरू होईल. तत्पूर्वी सकाळी शालेय विद्यार्थ्यांची चिपळूण नगर परिषद ते इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, अशी दिंडी काढण्यात येईल. या लोककला महोत्सवात समूह नृत्य, समूह गायन, एकल गीत, एकल नृत्य, एकल वाद्य वादन, अशा स्पर्धांचा महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:07 PM 01/Oct/2024