एसटी भाडेवाढीवर संजय राऊत म्हणाले..

मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांसाठी हक्काचे साधन अशी ओळख असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी बसेसच्या तिकीट दरात १४.९७ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे. ही दरवाढ आजपासूनच लागू होणार असल्याचीही माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता लालपरीचा प्रवास महागणार आहे.

दरम्यान, यावर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. “हे सरकार गोंधळलेल्या मानिसकतेत आहेत. अर्थमंत्री एका बाजूला. मुख्यमंत्र्यांचं तोंड दुसऱ्या बाजूला. ठाण्यातील उपमुख्यमंत्र्यांचं हेड क्वॉर्टर दरेगावला आहे. अशा प्रकारे सरकार चाललं आहे. आपआपल्या गटाचा मुख्यमंत्री वेगळा आहे. शिंदे गटाला वाटतं शिंदे त्यांचे मुख्यमंत्री, अजित पवार गटाला वाटतं अजित पवार त्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपला वाटतं फडणवीस त्यांचे मुख्यमंत्री. तीन-तीन मुख्यमंत्री प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काम करत आहेत. त्यामुळे निर्णय प्रक्रियेत गोंधळ आहे. देवेंद्र फडणवीस यांचं त्यांच्या सरकारवर नियंत्रण नाही. नियंत्रण असतं तर दोन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती” असं संजय राऊत एसटी भाडेवाढीवर बोलताना म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 25-01-2025