रत्नागिरी : शौर्य दिवस २९ सप्टेंबर रोजी पंचायत समिती सभागृह, चिपळूण येथे साजरा करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तहसिलदार चिपळूण प्रविण लोकरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमप्रसंगी विविध युध्दात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांच्या स्मृतीस स्मरुन पुष्पचक्र व पुष्प अर्पण करुन मानवंदना देण्यात आली. उपस्थित वीर पत्नी आणि वीरमाता यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला वीरपत्नी, वीरमाता, माजी सैनिक, शालेय विद्यार्थी, एन.सी.सी. चे विद्यार्थी, प्रशासकीय अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:16 01-10-2024














