लांजा : लांजा तालुक्यातील अल्पावधीत प्रवाशांच्या पसंतीला उतरलेले कोकण रेल्वेचे वेरवली बुद्रुक हॉल्ट दर्जा असलेले रेल्वे स्थानकामध्ये जलद गाडीला थांबा द्यावा, अशी मागणी तालुक्यातील जनतेमधून होऊ लागली आहे. लांजा तालुक्यात वेरवली बुद्रुक येथे वाहनाची दिवसरात्र वर्दळ असल्याने आणि कोल्हापूर, गोवाकडे जाण्यासाठी सोयिस्कर रस्ते मार्ग आल्याने वेरवली रेल्वे स्टेशन प्रवाशांसाठी सुखकर ठरत आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे एकातरी जलद गाडीला थांबा देण्यात यावा, अशी मागणी स्थानिक जनता व प्रवासी यांच्यामधून केली जाते आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:17 PM 01/Oct/2024














