रत्नागिरी : एस टी महामंडळाचा कणा असलेला प्रवाशांची प्रवासातील सर्वात जास्त जबाबदारी चालकांवर असते. त्या चालकांना (ड्रायव्हर) वेळोवेळी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. दळण-वळण क्षेत्रातील चालक हा महत्त्वाचा घटक असल्याने शुक्रवारी (दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी) एस टी आगार चालकांना गुलाब पुष्प देऊन चालक दिन साजरा करण्यात आला.
चालकांचे परिवहन क्षेत्रात किती महत्त्वाचे काम आहे, हे कोरोना काळात अधोरेखित झाल्याने त्यांना विसरता येणार नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेत चालकांचा असणारा महत्त्वाचा वाटा व एकूणच दळणवळण क्षेत्रामुळे गतिमान झालेल्या अर्थव्यवस्थेतील चालकांचे अमूल्य योगदान या दिवशी अधोरेखित केले जात असते. चालक दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी व्यवस्थापक (DM) संदीप पाटील यांनी रत्नागिरी आगारातील चालकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करून चालक दिन साजरा केला. यावेळी पाटील यांनी सर्व चालकांना चालक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:38 PM 25/Jan/2025














