लांजा महाविद्यालयात आज युवा काव्यवाचन स्पर्धा

लांजा : कोकण मराठी साहित्य परिषद, लांजा शाखा व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लांजामधील मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थांसाठी लांजा तालुकास्तरीय युवा स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

हि स्पर्धा २७ रोजी सकाळी १० वा. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लांजा येथे होणार आहे. स्पर्धेत लांजा तालुक्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील (पदवी स्तर) विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ दोन क्रमांकाला अनुक्रमे रुपये १००० रू., ७५१, ५०१, २५१ रू. व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याबाबत माहितीसाठी रामचंद्र जाधव, प्रा. डॉ. बावधनकर यांच्याशी संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 27/Jan/2025