रोहा : रेल्वे जलद गाड्यांमध्ये रोहेकरांना प्रवास करण्याची संधी मिळावी, अशा पाच दूर पल्ल्याच्या गाड्यांना आपण रोहा रेल्वेस्थानकात थांबा मिळवण्यात यशस्वी झालो आहोत. रोहेकरांची ही मागणी घेऊन मुंबई येथे रेल्वे विभागीय व्यवस्थापक कार्यालयात बैठक घेऊन हा प्रस्ताव त्यांच्याकडे मांडला होता. शेवटी या सर्व गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला. त्यातील कोचुवेली-इंदोर एक्स्प्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवत आहोत, असे प्रतिपादन खा. सुनील तटकरे यांनी रोहा येथे केले.
रोहा रेल्वेस्थानकात कोचुवेली इंदोर, लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव, हिस्सार-कोईम्बतूर, कोचुवेली-चंदीगड तिरुणवेली-दादर अशा गाड्यांना थांबा देण्यात आला असून, यातील कोचुवेली इंदोर एक्स्प्रेस या गाडीला थांबा देण्यात आला आहे. ही गाडी मुंबईकडे रवाना होताना खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यासाठी आयोजित कार्यक्रमात तटकरे बोलत होते.
रोहा स्थानकात १० जलद गाड्यांना थांबा मिळाला असल्याचेही त्यांनी जाहीर केले. यावेळी महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे, माजी आ. अनिकेत तटकरे, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी शशी भूषण, राजू रंजन, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर, तालुका अध्यक्ष विनोद पाशीलकर, माजी नगराध्यक्ष लालता प्रसाद कुशवह, शहर अध्यक्ष अमित उकडे, माजी सभापती रामचंद्र सकपाळ, भाजप शहर अध्यक्ष यज्ञेश भांड, वसंत शेलार, नंदकुमार म्हात्रे, महेंद्र गुजर, महेश कोलाटकर, अहमद दर्जी, सुभाष राजे, राजेंद्र जैन, मयूर दिवेकर, राजू पोकळे, नवनीत डोलकर आदींसह रेल्वेचे अधिकारी, राष्ट्रवादी कार्यकर्ते व रोहेकर नागरिक उपस्थित होते. यावेळी ना. अदिती तटकरे यांनी दहा नवीन जलद गाड्या रोहा रेल्वेस्थानकात थांबणार आहेत. रोहा रेल्वेस्थनाकात जलद गाड्या थांबाव्यात ही रोहेकरांची मागणी होती. खा. सुनील तटकरेंच्या पुढाकाराने व आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने ही मागणी पूर्ण होत रोहा रेल्वेस्थानकात जलद गाड्या थांबणार आहेत. रोहा असे एकमेव रेल्वे स्थानक आहे त्याचे अंतर्गत व बाह्य सुशोभीकरण करण्यात येणार आहे. रेल्वेने अंतर्गत सुशोभीकरण करण्याचे मान्य केले असून, २० कोटींचा निधी या सुशोभीकरणासाठी मंजूर केला आहे, असे ना. आदिती तटकरे यांनी सांगितले.
यावेळी प्रास्ताविक करताना विभागीय अभियंता वाय. पी. सिंग यांनी रोहा रेल्वेस्थानकात जलद १० गाड्या थांबविण्याची घोषणा रेल्वेच्या वतीने केली. यामुळे प्रवाशांची यात्रा सुखकर होईल. मंत्री आदिती तटकरेंच्या सहकायनि २० कोटी रुपये खर्चुन रोहा रेल्वेस्थानक नूतन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 27/Jan/2025














