राजापूर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय उद्योजकता प्रथम पुरस्कार यावर्षी राजापूर तालुक्यातील डोंगर येथील साखरकर बेकरी उद्योगाला जाहीर झाला होता. प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या बेकरीचे सर्वे सर्वा सिराज व शरफुद्दीन साखरकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
साखरकर बेकरीच्या अनेक विविध उत्पादनांसोबत इन्स्टंट शाही पराठे व इन्स्टंट पुरणपोळी देशपरदेशात प्रसिध्द आहे. उत्कृष्ट लघु उद्योजकांना जिल्हा पुरस्कार २०२३-२४ अंतर्गत प्रथम पुरस्कारासाठी तालुक्यातील डोंगर येथील साखरकर बेकरीची निवड करण्यात आली. रोख रक्कम १५ हजार रूपये, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हा पुरस्कार पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण कार्यक्रम रविवार दि. २६ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअम रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला होता. साखरकर बेकरीला जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचा उद्योजकता पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल साखरकर बेकरीचे मालक साखरकर बंधुंचे अभिनंदन होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:00 PM 27/Jan/2025














