गुहागर मधून कोण निवडणूक लढवणार ? सामंतांनी सांगूनच टाकले

गुहागर : विपुल शिंदे, निलेश राणे यांच्या संभाव्य उमेदवारी वरून गुहागर मतदारसंघ मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेला पहावयास मिळत आहे. श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम हे गुहागर मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. याच पार्श्वभूमीवर रामदास कदम यांच्याकडून विपुल शिंदे यांच्या नावाला विरोध पाहायला मिळतोय. तसेच नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे हे देखील कुडाळ किंवा गुहागर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आज केलेले वक्तव्य मोठा खुलासा करणारे ठरले आहे.

सामंत आज खेड दौऱ्यावर असून यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी गुहागर मतदार संघाबाबत मोठे भाष्य केले आहे. विपुल कदम यांच्या उमेदवारीबाबत त्यांना विचारे असता त्यांनी स्पष्टपणे सांगितले की या गुहागर मतदार संघाबाबत माझी मुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा झाली असून या ठिकाणी शिवसैनिकच निवडणूक लढवेल बाकी कोणीही निवडणूक लढवणार नाही. नातेवाईकांनी निवडणूक लढवण्याचा मुद्दा जो तयार करण्यात आलाय त्याच्याशी आम्ही शिवसेना सहमत नाही. माजी मंत्री रामदास कदम हे शिवसेनेचे जेष्ठ नेते आहेत, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी थेट बोलू शकतात, अजून तिकिटाची चर्चा नाही, गुहागरची जागा कुणासाठी सुटणार याबाबत देखील चर्चा नाही. विपुल कदमांनी बॅनर लावले म्हणजे त्यांना उमेदवारी मिळाली असा अर्थ होत नाही. मी जबाबदारीने सांगतो की नातेवाईकांना उमेदवारी देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला नाही. या ठिकाणी शिव सैनिकालाच उमेदवारी मिळेल. रामदास कदमांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन आपला गैसमज दूर करावा असा सल्ला देखील उदय सामंत यांनी यावेळी बोलताना दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:12 01-10-2024