रत्नागिरी : जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रभारी प्रबंधक कृष्णा चव्हाण सेवानिवृत्त

रत्नागिरी : येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रभारी प्रबंधक कृष्णा दत्ताराम ऊर्फ बावा चव्हाण हे सोमवारी सेवा निवृत्त झाले. यावेळी जिल्हा न्यायालयातील कर्मचारी, वकील वर्ग यांच्याकडून चव्हाण याना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. कृष्णा चव्हाण हे १९९० ला सावंतवाडी न्यायालय येथे कनिष्ठ लिपिक म्हणून सेवेत रुजू झाले. त्यानंतर त्यांनी कुडाळ, रत्नागिरी, लांजा, राजापूर, देवरूख, खेड व रत्नागिरी आदी न्यायालयाच्या ठिकाणी सेवा बजावली. २०२५ मध्ये त्यांना वरिष्ठ लिपिक म्हणून बढती मिळाली. त्यानंतर २०१९ मध्ये सहायक अधीक्षक व २०२३ मध्ये त्यांनी अधीक्षक म्हणून पदभार सांभाळला, तर १ मार्च २०२४ ला जिल्हा न्यायालय रत्नागिरी येथील त्यांची प्रभारी प्रबंधक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. निवृत्तीप्रसंगी कृष्णा चव्हाण यांनी ५० हजार रुपये जिल्हा न्यायालय कर्मचारी कल्याण निधीसाठी दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:13 PM 01/Oct/2024