दापोली : दापोली आगाराला ८० बसेस आवश्यकता असून, पहिल्या टप्प्यामध्ये ८ बसेस आल्या आहेत. इलेक्ट्रिक श्रेणीतील ३५ बसेस या पुढील काळात दापोली आगाराला येणार आहेत, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.
दापोलीत आगारामध्ये नव्या बसेस दाखल झाल्या असून, याचा लोकार्पण सोहळा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत दापोली बस स्थानकामध्ये करण्यात आला. योगेश कदम म्हणाले, दापोली आगाराला आणखी नव्या बसेस देण्याचा प्रयत्न या पुढील काळात आपण करणार असून, दापोलीवर लक्ष देतानाच खेड आणि मंडणगड येथे दुर्लक्ष होणार नाही. दरवर्षी ५००० नव्या बसेस चालनात आणण्याचे ठरवले असून, यावर्षी महाराष्ट्राला त्या बसेस उपलब्ध होणार आहेत. दापोली आगाराला ८० बसेस आवश्यकता असून, पहिल्या टप्प्यामध्ये ८ बसेस आल्या आहेत. इलेक्ट्रिक श्रेणीतील ३५ बसेस या पुढील काळात दापोली आगाराला येणार आहेत. त्यानंतर पुढील काही महिन्यांत दापोली आगाराला नव्या बसेस देण्याचे आपण प्रयत्न करणार आहोत. फीत कापून नव्या ८ बसेसचे लोकार्पण करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 28/Jan/2025














