साखरपा : देवडे गावात बीएसएनएलचा टॉवर असूनही रेंज नसल्यामुळे गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही कारभार सुधारात नसल्यामुळे देवडे गावचे सरपंच विलास कांगाणे यांनी अखेर आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
देवडे हे गाव विशाळगडाच्या पायथ्याच्या खोऱ्यात सामावलेले आहे. मुख्य बाजारपेठेपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव दुर्गम परिसरात येते. या गावात बीएसएनएलचा टॉवर असल्यामुळे अनेकांनी बीएसएनएलची कार्ड घेतली आहेत. गावात अन्य कोणत्याही कंपनीची रेंज येत नसल्यामुळे बीएसएनएल हा एकमेव संपर्काचा आधार आहे. परंतु गावातील हा टॉवर सातत्याने गेली अनेक दिवस बंद आहे. यासंदर्भात देवरुख आणि रत्नागिरी येथे वारंवार संपर्क साधला असताही आणि पत्रव्यवहार केला असताही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे देवडे सरपंच विलास कांगणे यांनी लवकरच आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 28/Jan/2025









