संगमेश्वर : ग्रामस्थांच्या सहकार्यामधून करंबेळे शेवरवाडीतील प्राथमिक शाळेचा कायापालट

संगमेश्वर : ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे ग्रामीण भागातील या शाळा नेहमीच अग्रेसर असतात. ग्रामस्थांनी मनात आणलं तर एकजुटीच्या जोरावर शाळेचा कायापालट होतो. याचे उदाहरण म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे शेवरवाडी प्राथमिक शाळा.

संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे शेवरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे गत महिन्याभरात, वाडीच्या विविध भागातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन संपूर्ण शाळेचे रूपडेच पालटून टाकले आहे. दिवसभर नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी काम करून सायंकाळी घरी आल्यानंतर आपल्या वाढीतील शाळेसाठी वाडीतील आवालयद, महिला या सर्वांनीच सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत श्रमदान केले काहीवेळा तर ६० ते ७० ग्रामस्थांनी एकत्र येत सलग दोन दिवस शाळेची संपूर्ण डागडुजी केली. ग्रामस्थांच्या या श्रमदानात तरुणांनी चांगलाथ पुढाकार घेतला.

शाळेच्या लोखंडी रूफिंगला घासून रंगकाम करणे, वगाना रंगकाम करणे, बाल आनंद संगमंचाला रंगकाम करणे, शाळेबाहेरील परिसराची डागडुजी करणे, ध्वजस्तंभाची शोभा वाढवणे अशी एकना अनेक कामे शेवरवाडीच्या विविध भागातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदानातून पार पाडली. एवढेच नव्हे, तर ग्रामस्थांनी प्रत्येक घरातून आर्थिक योगदानही दिले. याच्या जोडीला काही देणगीदारही पुढे आले. ठेकेदार विक्रांत दर्डे यांनी रंग दिला, माजी शिक्षकांनी आर्थिक योगदान दिले. नरोटे यांनी विद्यार्थांसाठी उत्तम दर्जाच्या वह्या दिल्या, प्रशालेत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनीही आपले आर्थिक योगदान देऊन कर्तव्य भावना बजावली. ग्रामस्थांनी रंगमंचाला नवा साज देताना “बाल आनंद रंगमंच” असे सुंदर नाव देऊन रासा फलकही लावला आहे.

ग्रामस्थांसह देणगीदारांनी दिलेल्या या योगदानाबद्दल तसेच चित्रकार किशोर प्रसादे यांच्या मौलिक सहकार्याबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका पूजा टाकळे, सहशिक्षिका वेदिका पराडकर, अंगणवाडी सेविका संचिता गोंधळी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. बिटच्या विस्तार अधिकारी आखाडे, केंद्रप्रमुख धामणस्कर यांनी शाळेच्या भौतिक प्रगतीबाबत समाधान व्यक्त करून करंबेळे शेवरवाडी ग्रामस्थांना त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल धन्यवाद दिले आहेत.

चित्रांमुळे वातावरण बोलके
संगमेश्वर येथील प्रख्यात चित्रकार किशोर प्रसादे यांनी करंबेळे शेवरवाडी शाळेत येऊन आणि सायंकाळी उशिरापर्यंत थांबून एकापेक्षा एक उत्तम अशी शैक्षणिक चित्रे रेखाटली आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 28/Jan/2025