रत्नागिरी : सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयाचे ग्रेड परीक्षेत यश

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी या प्रशालेने एलेमेंटरी व इंटरमिजिएट शासकीय रेखाकला परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल नुकताच लागला.

त्यामध्ये प्रशालेने एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचा शंभर टक्के निकाल लागला. एलेमेंटरी परीक्षेत 5 विद्यार्थ्यांना A ग्रेड तर 9 विद्यार्थ्यांना B ग्रेड , त्याच पद्धतीने इंटरमिजिएट परीक्षेत 3 विद्यार्थ्यांना A ग्रेड तर 7 विद्यार्थ्यांना B ग्रेड मिळाली. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे कलाशिक्षक अनिल सागवेकर यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचेवर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, मा. राजनजी मलूष्टे (अध्यक्ष शाळा समिती), प्रशालेचे प्र. मुख्याध्यापक अनिल चव्हाण, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्यातर्फे अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 28-01-2025