रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाने चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयात झालेल्या भूगोल विषयक जिओत्सवातील विविध स्पर्धांमध्ये यश मिळवले. यात व्हॉग, फोटोग्राफी आणि प्रश्नमंजुषा स्पर्धांमध्ये यश मिळविले.
व्हॉग स्पर्धेत देव महाविद्यालयाच्या प्रज्वल कळंबटे व सोहम शिंदे या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. प्रश्नमंजुषेमध्ये आर्यन वाघधरे या विद्यार्थ्याने द्वितीय तर फोटोग्राफी स्पर्धेत सुमित तारवे व आकाश रणसे विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी अभिनंदन केले. सहभागी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील भूगोल विभागप्रमुख प्रा. ऋतुजा भोवड व रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. आसावरी मयेकर यांनी मार्गदर्शन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 28/Jan/2025














