रत्नागिरी : जिल्ह्याच्या पर्यटनाला दिशा देण्याच्या हेतूने रत्नागिरी येथे झालेल्या पर्यटन परिषदेत लांजा तालुक्याच्या पर्यटनवृद्धीसाठी कार्यरत असणारे लव्हेबल लांजा व रत्नसिंधू टूरिझमचे संचालक विजय हटकर यांना पर्यटन मित्र’ या पुरस्काराने सन्मानित केले.
जागतिक पर्यटनदिनानिमित्ताने रत्नागिरीतील विवा एक्झिक्युटिन येथे महाराष्ट्र पर्यटन विकास संचलनालय कोकण विभाग, रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था व लायन्स क्लब रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यटन आणि शांतता’ या विषयावर आधारित पर्यटन परिषद झाली. या परिषदेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार, कोकण विभागाचे पर्यटन उपसंचालक हनुमंत हेडे, भाजप नेते नीलेश राणे, माजी आमदार बाळासाहेब माने, माजी उपाध्यक्ष उदय बने, सोबत कोकणचे संजय यादवराव, रमेश कीर, इन्फिगो आयकेअरचे डॉ. श्रीधर ठाकूर, राजू भाटलेकर आदी उपस्थित होते. लांजा तालुक्यातील शेट्ये प्रशालेत सहाय्यक शिक्षक मागून कार्यरत असणारे हटकर लांजा तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी आपल्या सहका-यांसमवेत लवेबल लांजा व रत्ननसिंधू टुरिझम या संस्थांच्या माध्यमातून काम करत आहेत. सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेला लांजा तालुका जैवविविधतेने संपल असलेली गावे, नद्या, डोंगर, किल्ले, लेणी, वाडे, मंदिरे, धरणे, धबधबे, कातळशिल्पे याबाबतीत पर्यटन समृद्ध असून त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी लांजा तलुका पर्यटन नकाशाची निर्मिती हटकर यांनी केली. थंड हवेचे ठिकाण म्हणून नावारुपाला आलेल्या माचाळा गावाला प्रसिद्धी देण्यासाठी ‘माझे माचाळ’ या पर्यटन पुस्तिकेचे त्यांनी लेखन केले आहे. माचाळ येथे पहिल्या सापड लोककला पर्यटन महोरगर येथे पर्यटन परिषदेचे आयोजन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:22 PM 01/Oct/2024














