रत्नागिरी : खालगाव येथे कायदा मार्गदर्शन कार्यशाळा

जाकादेवी : रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत केंद्र शासन नवीन कायदा अंमलबजावणी अनुषंगाने जाकादेवी येथील काळे यांच्या मंगल कार्यालय हॉल येथे तालुका स्तरावर कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेकरीता प्रमुख मार्गदर्शक अमित बायकुळ, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण यांनी सन २०२३ नव्याने अस्तित्वात आलेल्या कायद्याबाबत मार्गदर्शन केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे पांडूरंग नंदिवाले, पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी सायबर क्राईम, ऑनलाईन फसवणूक व त्याची सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, महिला अत्याचार, पोक्सो कायदा अनुषंगाने मार्गदर्शन केले. यावेळी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक व खालगावचे बीट अंमलदार महेश टेमकर उपस्थित होते.

यावेळी जाकादेवी-खालगाव येथील ग्रामस्थ, रिक्षा संघटना पदाधिकारी, व्यापारी संघटना पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर व पोलीस पाटील असे एकूण ७५ पदाधिकारी, कर्मचारी व नागरिक तसेच तात्या साहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:56 PM 28/Jan/2025