साडवली : संगमेश्वर तालुक्यातील काटवली, सायले, विघ्रवली, कोंडओझरे, सोनवडे, बोरसूत या पंचक्रोशीचा माघी गणेशोत्सव काटवली (ढोसळवाडी) येथे शनिवार दि. १ फेब्रुवारी ते बुधवार दि.५ फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांनी होणार आहे.
पंचक्रोशीचा राजा गणपती माझा मित्र मंडळाच्या वतीने गेली अनेक वर्षे हा माघी गणेशोत्सव साजरा होत आहे. दि.१ रोजी सकाळी १०.०० वा. सोनवडे वरची वाडी येथून मिरवणुकीने बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यानंतर ११.०० वा. स्थापना, पूजाअर्चा, अभिषेक, आरती, आरती प्रसाद, दुपारी १.०० वा. महाप्रसाद, साय, ७.०० वा. आरती प्रसाद, रात्री ८.०० वा. नवतरुण विश्वकर्मा भजन मंडळ, कॉडओझरे यांची भजनसेवा, रात्री ८.३० वा. महाप्रसाद, तर रात्री १०.०० वा. पंचक्रोशीतील कलाकारांचे कलागुण सादरीकरण होणार आहेत.
दि. २ रोजी सकाळी ११.०० वा. पूजा अभिषेक, आरती, सायं. ७.०० वा. आरती प्रसाद, रात्री ८.०० वा. श्री विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ, पुनर्वसन (किंजळे) यांची भजनसेवा, रात्री ९.०० वा. महाप्रसाद, रात्री १०.०० वा. मालती प्रॉडक्शन रत्नागिरी प्रस्तुत, रंग हा लावणीचा कार्यक्रम होणार आहे. दि. ३ रोजी सकाळी ११ वा. पूजा अभिषेक, आरती, सायं. ७.०० वा. आरती प्रसाद, रात्री ८.०० वा. मंगलमूर्ती महिला भजन मंडळ, विघ्रवली (खालचीवाडी) यांची भजनसेवा, तर रात्री ९ वाजता महाप्रसाद, रात्री १० वा. श्री ग्रामदेवता लोककला नाट्य नमन मंडळ, माभळे (जाधववाडी) यांचा कार्यक्रम होणार आहे.
दि. ४ रोजी सकाळी ११.०० वा. पूजा अभिषेक, आरती, दुपारी ३.०० वा. हळदीकुंकू समारंभ, दुपारी ४.०० वा. संगमेश्वरी भजन मंडळ, संगमेश्वर यांची भजनसेवा, सायं. ७ वाजता आरती प्रसाद, रात्री ८ वा सिद्धीविनायक भजन मंडळ, ओझरेखुर्द यांची भजनसेवा, ९ वा महाप्रसाद तर रात्री १० वा. शिवराज कलामंच नाट्य नमन मंडळ, रत्नागिरीचा कार्यक्रम होणार आहे. दि. ५ रोजी सकाळी १०.०० वा. पूजा, अभिषेक, आरती, दुपारी ०१.०० वा. महाप्रसाद, दुपारी ४.०० वा. पारंपरिक लाठीकाठी कार्यक्रमाने पंचक्रोशी राजाची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:01 PM 28/Jan/2025














