रत्नागिरी जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या क्रिकेट स्पर्धेत चिपळूण ग्रामसेवक संघटना विजयी

चिपळूण : रत्नागिरी जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील ग्रामसेवकाच्या पुरूष व महिला गटाच्या क्रिकेट स्पर्धा तालुक्यातील अडरे येथील मैदानावर झाल्या. पुरुष गटात चिपळूण तालुक्याने संगमेश्वर संघावर मात करीत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले, तर महिला ग्रामसेवक गटात संगमेश्वर तालुक्याने लांजा तालुक्याचा पराभव करीत विजेतेपद पटकावले.

स्पर्धेत पुरूष गटात पहिला उपांत्य फेरीचा सामना चिपळूण व रत्नागिरी तालुक्याच्या संघामध्ये झाला. यामध्ये चिपळूण तालुक्याने विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. दुसरा उपांत्य सामना संगमेश्वर व खेड तालुक्याच्या संघामध्ये झाला. यामध्ये संगमेश्वर संघाने चमकदार कामगिरी करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात चिपळूणच्या संघाने संगमेश्वर संघावर मात करीत विजेतेपद पटकावले.

महिला गटात ६ तालुक्यांचे संघ सहभागी झाले होते. महिलांमधील अंतिम सामना संगमेश्वर विरूद्ध लांजा तालुक्यात झाला. संगमेश्वरमधील खेळाडूंनी दमदार कामगिरी करीत विजेतपद पटकावले. संघटना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या संघांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. चिपळूण तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष योगेश शिर्के यांनीही उपस्थित राहून ग्रामसेकांना प्रोत्साहन दिले. चिपळूण तालुका ग्रामसेवक संघटनेचे सचिव असलेल्या रोहिदास हांगे यांनी कर्णधार म्हणून यशस्वी कामगिरी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:23 PM 28/Jan/2025