रत्नागिरी : बोटीवर पडून गंभीर जखमी झालेल्या नेपाळी खलाशाचा उपचारांदरम्यान कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला. सुरज राना (१८, रा. कृष्णापूर जि. कंच्चनपूर, नेपाळ) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी तो मिरकरवाडा येथील बोटीवर काम करत असताना बोटीत अडकून पडला होता. तेव्हा त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचारांसाठी नेउन अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:49 PM 28/Jan/2025














