फिनोलेक्स कंपनीच्या जागेतील भंगार चोरीप्रकरणात चौघांना अटक

रत्नागिरी : गोळप येथील फिनोलेक्स कंपनीच्या जागेतील भंगार चोरुन बोलेरो गाडीतून नेणाऱ्या ४ संशयितांना तेथील सिक्युरिटी ऑफीसरने पकडून पोलिसांच्या हवाली केले. ही घटना गुरुवार २३ जानेवारी रोजी रात्री घडली. आदेश गणेश पाटल (३०, मुळ रा. शिवार आंबेरे पाटीलवाडी सध्या रा. कोकणनगर, रत्नागिरी), दीपक (पूर्ण नाव गाव माहित नाही रा. रत्नागिरी) व इतर दोन अशा एकूण चार जणांना पूर्णगड पोलिसांनी अटक केली. त्यांच्या विरोधात रमेश मोहन कदम (मुळ रा. चिपळूण सध्या रा. फिनालेक्स वसाहत रनपार गोळप, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:54 PM 28/Jan/2025