रत्नागिरी : ग्रामीण भागातील साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राजापूर-लांजा नागरिक संघाचे दहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन वाटूळ येथे या महिनाअखेर होणार आहे.
त्यामध्ये शस्त्रांसह चित्रप्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे.
ज्येष्ठ साहित्यिक दिनकर गांगल यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या साहित्य संमेलनामध्ये अनेक नामवंत लेखक, कवी, नाटककार सहभागी होणार आहेत. संमेलनात वृषाली रणधीर यांच्या मी सावित्रीबाई फुले बोलतेय या एकपात्री कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना शिक्षणाची द्वारे खुली करणार्या समाजसुधारक सावित्रीबाई फुले अवतरणार आहेत. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार, कवी, लेखक विजयराज बोधनकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन, इतिहास अभ्यासक सुनील कदम यांचे शस्त्र प्रदर्शन, प्रसिद्ध चित्रकार दिगंबर मांडवकर यांचे चित्र प्रदर्शन संमेलनात असेल. १ फेब्रुवारीला सकाळी ११ ते ५ आणि २ फेब्रुवारीला सकाळी ९ ते १ या वेळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत चित्रकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेमध्ये सहभागी होणार्या विद्यार्थ्यांनी सोबत चित्रकला कागद किंवा वही, पेन्सिल, पेन, रंग, ब्रश आदी साहित्य सोबत आणावे लागणार आहे. या कार्यशाळेचा तसेच विविध प्रदर्शनांचा जास्तीत जास्ती विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:26 28-01-2025














