कारची बॉक्सवेलला धडक; चालक गंभीर

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरून धावणार्‍या कारचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने अनियंत्रित झालेली कार महामार्गाच्या बॉक्सवेलला धडकली. या अपघातात सुजित बाजीराव जमेनीस (47, रा. रत्नागिरी) हा कार चालक गंभीर जखमी झाला. कारचेही मोठे नुकसान झाले. मंगळवारी सायंकाळी 6 वा. च्या सुमारास कुडाळ काळपनाका येथे हा अपघात घडला.

कारचालक सुजीत जमेनीस हे कार घेऊन सावंतवाडी ते ओरोस जात होते. स्थानिक नागरिकांनी सुजित जेमिनीस यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. पोलिस महेश भोई यांनी घटनास्थळी पंचनामा केला. या अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया कुडाळ पोलिसात रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 29-01-2025