चिपळूण : धामणवणे टेरव येथील अतिशय महत्वाचा दोन्ही गावाला जोडणारा रस्ता आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून मंजूर झाल्याने या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न झाले. या महत्त्वाच्या क्षणी आमदार शेखर निकम यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला, ज्यामध्ये ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होते.
आमदार शेखर निकम यांचे कार्य समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचत आहे. गावाचा विकास व गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी दाखवलेला तत्पर प्रतिसाद याचेच द्योतक आहे. या भूमिपूजनाने अपेक्षांना नवा दिशा मिळाली असून, विकासाच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलले गेले आहे.
यावेळी तालुका अध्यक्ष अबूशेठ ठसाले, विजय वरेकर, राजेंद्र पवार, विश्वास दादा वाजे, राजेश बेंडके, अनिल बेंडके, मंगेश उंडरे, संतोष गुजर, सतीश जोशी, जोशी वहिनी, शेंबेकर वहिनी, संतोष गुजर, दिलीप शिंदे, दर्शन देशपांडे, शिरीष चौधरी, सुनील शिंदे, रवींद्र कदम, पांडरंग उंडरे, पंढरीनाथ राऊत, विक्रांत पवार, संतोष वरेकर, मकरंद पवार आदी मान्यवर उपस्थित होते..
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 29/Jan/2025














