येणारे नवरात्र हे चार राशींना अत्यंत फायद्याचे जाणार आहे. जणू काही या राशीमध्ये राजयोग असल्यासारखे बदल होणार आहेत. वैद्यक ज्योतिष शास्त्रानुसार ऑक्टोबर महिन्यात अनेक ग्रह राशी बदल करणार आहेत. या महिन्यात नवरात्र उत्सव देखील आहे. या नवरात्र उत्सवात हा राजयोग तयार होत आहे. ज्यामध्ये कर्म दाता शनिदेव राजयोग निर्माण करणार आहेत. त्याचबरोबर व्यवसायाचा दाता बुध भद्रा राजयोग निर्माण करत आहेत. तसेच या महिन्यात शुक्र यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण राज योग देखील तयार होणार. हा राजयोग या तीन राशींसाठी सुवर्णकाळ ठरू शकतो. तसेच या लोकांना करिअर आणि व्यवसायात मोठा फायदा देखील मिळू शकतो. तर आता आपण जाणून घेऊया नेमक्या कोणत्या या तीन भाग्यशाली राशी आहेत.
वृषभ
हा नवरात्र उत्सव म्हणजेच ऑक्टोबर महिना वृषभ राशीसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. कारण या महिन्यात तयार होणाऱ्या चार राज योगामुळे तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रगती साधता येऊ शकते. तसेच या महिन्यात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ देखील मिळू शकतो. तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोत प्रचंड प्रमाणात वाढू शकतात आणि यापूर्वी ठप्प झालेली अनेक कामे पूर्ण होऊन तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण येऊ शकतात. एकंदर या महिन्यात तुमच्या उत्पन्नामध्ये अचानक वाट देखील होऊ शकते. करिअरसाठी देखील हा काळ अत्यंत उत्तम आहे. या काळात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल.
सिंह
चार राज योग तयार झाल्यामुळे ऑक्टोबर महिना हा सिंह राशीसाठी प्रचंड अनुकूल ठरू शकतो. या काळात नशीब तुमच्याच बाजूने असेल असं तुम्हाला जाणवेल. तसेच या काळामध्ये तुमच्या नोकरीमध्ये देखील बदल होण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला नवीन आणि उत्कृष्ट संधी देखील मिळू शकतात. याचसोबत तुम्हाला नोकरीत देखील बढती मिळण्याची शक्यता आहे. या कालावधीत तुम्हाला कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी देखील मिळू शकते. या सर्व घटनांमुळे तुमच्या आयुष्यात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून आणि कनिष्ठानकडून देखील पूर्ण सहकार्य मिळेल यात शंका नाही. तुमची सर्व उद्दिष्टे वेळेवर पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता तसेच तुमच्या दैनंदिन उत्पन्नातही वाढ होऊ शकते.
तूळ
ऑक्टोबर महिना हा तर तुळ राशीसाठी अत्यंत फलदायी ठरू शकतो. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे मालव्य राजयोग तूळ राशीतच तयार होत आहे. शनि देवाचाही तुमच्या राशीवर प्रभाव होईल त्यामुळे चार राजयोग तयार झाल्याने तुमच्या दैनंदिन उत्पन्नात प्रचंड वाढ झालेली दिसून येईल. तसेच ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला एखादी चांगली बातमी देखील मिळू शकते. हा काळ तुमच्या वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने अविस्मरणीय ठरणार आहे. तसेच या महिन्यात तुमच्या सुख समृद्धी मध्ये वाढ होऊ शकते. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. याशिवाय तुम्ही वाहन किंवा मालमत्ता देखील खरेदी करू शकता.