रत्नागिरी : देव, घैसास, कीर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ मेकिंग कार्यशाळा

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाममध्ये कन्टेंट रायटिंग हा विषय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा अंतर्गत प्रथम वर्षासाठी वैकल्पिक विषयांतर्गत सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाला अनुसरून व्हिडिओ मेकिंग कार्यशाळा प्रथम वर्ष वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांकरिता झाली.

कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून प्रज्वल कळंबटे (द्वितीय वर्ष विज्ञान), सोहम शिंदे (द्वितीय वर्ष विज्ञान), सुमित तारवे (द्वितीय वर्ष वाणिज्य), सौमित्र जोशी (प्रथम वर्ष कला) या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. व्हिडिओ शूटिंग, एडिटिंग, रेकॉर्डिंग याबाबत सविस्तर माहिती देऊन असे व्हिडिओ आपण विविध सोशल मीडियावर पोस्ट करू शकतो. स्वतःचे यूट्यूब चॅनल, व्लॉग, फेसबुक पेज या माध्यमातूनही आर्थिक मिळकत मिळवू शकतो, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. काही व्हिडिओचे प्रात्यक्षिकही दाखवले. प्रास्ताविक प्रा. वसुंधरा जाधव यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 30/Jan/2025