मंडणगड : २९ सेवेत कायम करण्याच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीकरिता प्रजासत्ताक दिनी उपोषणास बसलेल्या – विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, आंबडवे या महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण तीन दिवसांनंतर स्थगित केले. या कर्मचाऱ्यांना विद्यापिठाने लेखी पत्र देऊन आश्वासन दिले.
मुंबई येथे कर्मचाऱ्यांच्या वतीने गावातील जागृती मंडळाचे शिष्टमंडळ व मुंबई विद्यापिठाचे अधिकारी यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर व त्यानंतर देण्यात आलेल्या लेखी आश्वासनाचे पत्रानंतर उपोषण मागे घेण्यात आले. महाविद्यालयास जमीन देणगी देणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विद्यापिठाने नियमानुसार सेवेत कायम केलेले नाही व त्यांना अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे शासन व विद्यापीठाच्या नियमामानुसार वेतन व अन्य भत्ते दिले जात नाहीत. त्यामुळे त्यांच्या सेवेच्या कालवधीतील वेतनाचा बॅकलॉक भरून काढावा, सेवेत कायम करावे व प्रतीक्षाधीन जमीन देणगीदारांच्या प्रतिनिधींना सेवेत कायम करावे यासाठी ग्रामस्थ व कर्मचारी शासन व विद्यापीठ दरबारी पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या पदरी केवळ आश्वासने पडत असल्याने त्यांनी उपोषण सुरू केले. या उपोषणात महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी, जमीन देणगीदार जमीनमालक सुशांत सकपाळ, अमोल सकपाळ, नीलेश सकपाळ, उदय जाखल, सुजाता सकपाळ, विनीत सकपाळ, प्रीती तांबे, प्रफुल्ल तांबे, राजेंद्र राऊत, रमेश सकपाळ, सौरव सकपाळ, प्रशांत सकपाळ, अक्षय सकपाळ हे आंबडवे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे उपोषणास बसले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 30/Jan/2025














