चिपळूण : मार्कंडी प्रभात रोड परिसरातील समस्या सोडवण्याची मागणी

चिपळूण : शहरातील प्रभात रोड मार्कंडी भागात असलेल्या नागरी वस्तीत विविध समस्या निर्माण झाल्या असून त्या नगर परिषदेने तातडीने सोडवाव्यात, या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकारी विशाल भोसले यांना प्रभात रोड फाऊंडेशनचे अध्यक्ष उमेश काटकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले.

मार्कंडी भागात असलेल्या प्रभात रोडच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आणि पर्यायी रस्ते असल्याने या ठिकाणी मोठी वर्दळ असते. मात्र, या ठिकाणी अनेक समस्या आहेत. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उमेश काटकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ, मोरे, प्रमोद लाड, संजय कांबळी, प्रकाश भिडे, माधव मुसळे, दीपिका आगवेकर यांसह अन्यजणांनी भेट घेऊन निवेदन देत चर्चा केली. त्यानुसार या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यातच गॅस पाईपलाईनच्या कामामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या खड्यांमुळे धुरळा उडून नागरी वस्तीला त्रास होत आहे. रस्त्यावर पाणी मारण्याची व्यवस्था करावी, सांडपाण्याचा निचरा होणाऱ्या गटारांची व्यवस्था करावी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 30/Jan/2025