लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा हल्लाबोल

मुंबई : लाडकी बहिण योजना ( Ladki Bahin Yojana) ही सत्तेपोसाठी आणलेली योजना असल्याचे वक्तव्य प्रहारचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu )यांनी केलं आहे. सोयाबीनचे, कापसाचे भाव पडले आहेत.

लाडक्या बहिणींना अॅडव्हान्स पैसे देता आणि कष्ट करणाऱ्या लोकांना पैसे देत नाहीत, असे म्हणत कडू यांनी राज्य सरकारवर टीका केली. दिव्यांग नागरिकांना 6 महिने झाले पैसे भेटले नाहीत असे बच्चू कडू म्हणाले.

MPSC च्या परीक्षांबाबत देखील बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. याबाबात राजकारणी आणि प्रशासनातील लोकांना फार गांभीर्यानं नाही असे कडू म्हणाले. शहरात युवक अभ्यास करून नोकरीसाठी प्रयत्न करत असतात. तरी नोकरी मिळत नसेल तर काय बंदुक घ्यावी का हातात? असा सवाल कडू यांनी केलाय

केंद्रात अजित पवारांपेक्षा शरद पावर आणि उद्धव ठाकरे सक्षम आहेत

चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर देखील बच्चू कडू यांना विचारण्यात आलं. यावेली ते म्हणाले की, राज्यापेक्षा केंद्र सरकार महत्वाचं आहे. केंद्रात अजित पवारांपेक्षा शरद पावर आणि उद्धव ठाकरे सक्षम आहेत असे कडू म्हणाले. बीड पालकमंत्री अजित पावर झालेत, याबाबत देखील विचारण्यात आले, यावेळी कडू म्हणाले की, रामाचे मंदिर बांधून देशावर उपकार केले पण त्याचं रामराज्य तयार झाल पहिजे. अनेक वाल्मिक कराड आहेत असेही कडू म्हणाले. कष्ट करणारे उपाशी मारतात हे दुर्दैवी असल्याचे कडू म्हणाले.

सत्तेतील माणूस राजीनामा मागतोय आणि सत्तेतील माणूस राजीनामा देत नाही

मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना कडू म्हणाले की, ही देशातील पहिली घटना आहे की, सत्तेतील माणूस राजीनामा मागतोय आणि सत्तेतील माणूस राजीनामा देत नाही असे कडू म्हणाले. काही लोक याचं राजकारण करत आहेत. कोणत्या गोष्टीचे राजकारण करावं कोणत्या नाही? याचा ताळमेळ राहिला नाही असेही कडू म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. वाल्मिक कराड हेच सुत्रधार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळं याप्रकरणाची कोणत्याही दबावाखाली चौकशी झाली नाही पाहिजे. यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असी मागणी केली जात आहे. विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी देखील धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:30 30-01-2025