पाली माईनवाडी येथे दारूच्या नशेत पत्नीला मारहाण

रत्नागिरी : दारूच्या नशेत पत्नीला बेदम मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पती विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार 28 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वा. सुमारास पाली माईनवाडी येथे घडली.

विठ्ठल दत्ताराम माईन (मुळ रा.पाली सध्या रा.मुलुंड,मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित पतीचे नाव आहे. त्याच्या विरोधात पीडित पत्नीने तक्रार दिली आहे. पती विठ्ठल आपल्या मुलांसह मुंबईहून पाली येथे आपले आर.डी.चे पैसे काडण्यासाठी आली होती. त्यांना परत मुंबई जायचे असल्याने ती घरातील सामानाची आवराआवर करुन पतीची वाट पहात होती.

सायंकाळी 6 वा. सुमारास तिचा पती हा अतिप्रमाणात मद्य प्राशन करून घरी आला. दारुच्या नशेत तो पत्नी व मुलांना बडबडत होता. त्यावर पत्नीने त्याला आपल्याला मुंबईला जायचे आहे लवकर निघा, असे सांगितले. याचा राग मनात धरुन त्याने पत्नीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत झटापट केली.

त्यावेळी त्याच्या हातातील कोयती पत्नीच्या मानेला लागून किरकोळ दुखापत झाली. त्यांचे भांडण पाहून चुलत सासरे व सासू यांनी त्यांची झटापट सोडवून हातातील कोयती काढून घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 31-01-2025