दाभोळेत आजपासून माघी गणेशोत्सव

साखरपा : श्री गणेश सेवा मंडळ दाभोळे व तरुण विकास मंडळ मुंबई आणि सांगली ग्रुप यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे दि. ३१ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान माघी गणेश जयंती उत्सव साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. अभिषेक दुपारी ३ ते ६ विविध खेळांच्या क्रीडा स्पर्धा, सायंकाळी ७ वाजता आरती सायंकाळी ७ ते ८ हरिपाठ रात्री ९ वाजता मुला मुलींचे रेकॉर्डडान्स होणार आहेत. दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ गणेश जन्मसोहळा, ११ ते १.३० वाजता सत्यनारायण महापूजा व हळदीकुंकू दुपारी १.३० ते ३.३० वाजता महाप्रसाद सायंकाळी ४ ते ६ विविध खेळांच्या क्रीडा स्पर्धा, रात्री १० वाजता मान्यवरांचा स्वागत समारंभ आणि रात्री १०.३० वाजता बहुरंगी नमन हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली तालुका संगमेश्वरचे नमन होणार आहे. या कार्यक्रमांना उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 31/Jan/2025