तरुणांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न प्रशंसनीय : आमदार योगेश कदम

खेड : तरुण पिढीला एकत्रित आणून त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी आपण घेत असलेले प्रयत्न खरोखरच प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्‌गार गृह राज्य मंत्री ना. योगेश कदम यांनी येथे काढले. प्रजासत्ताक दिनी कोकणी मुस्लिम संघ महिला आघाडी, अल्सफा वेलफेयर फौंडेशन आणि खेड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्रकला स्पर्धा २०२५ या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी ना. कदम म्हणाले, गेल्या तीन-चार वर्षांपासून सातत्याने या उपक्रमाला उपस्थित राहण्याचा मान मला मिळत आहे. आपल्या संघटनेच्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे दरवर्षी हा उपक्रम अधिकाधिक यशस्वी होत आहे. तरुण पिढीला एकत्रित आणून त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी आपण घेत असलेले प्रयत्न खरोखरच प्रशंसनीय आहेत. मला विशेष आनंद होतो की आपल्या मुस्लिम संघटनेच्या माध्यमातून समाजसेवा प्रभावीपणे केली जात आहे.

याशिवाय, दरवर्षी या कार्यक्रमात नवनवीन उपक्रमांची भर पडत असल्याचे पाहून खूप समाधान वाटते.

महिलांची संघटनाही तितकीच मजबूत आहे, आणि त्या प्रत्येक उपक्रमात आपले महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत, याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक अभिनंदन. आज आपण लहान मुलांपासून ज्युनिअर कॉलेजपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम आयोजित केले आहेत. अशा प्रकारे प्रत्येक वयोगटाला सामावून घेत आपण प्रजासत्ताक दिनाला एक वेगळे महत्त्व देत आहात. आपल्या या सामूहिक प्रयत्नांमुळे हा दिवस अधिक खास बनला आहे.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचा आपण भाग आहोत, ही बाब प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपला देश संविधानावर आधारलेला असून जगभरात सर्वाधिक महत्त्व संविधानाला आपल्याच देशात दिले जाते. प्रजासत्ताक दिन हा आपल्यासाठी फक्त उत्सव नसून आपल्या नागरिकत्वाच्या हक्कांचे स्मरण करू देणारा एक विशेष दिवस आहे.

अशा उपक्रमांच्या माध्यमातून आपण हा दिवस अधिक अर्थ बनवत आहात, याबद्दल पुन्हा एक आपण सर्वांचे अभिनंदन करतो, असे म्हणाले. यावेळी शालेय विद्यार्थांना चित्रकला घेतला. स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेतील प्रत्येक गटाती विजेत्या विद्यार्थ्यांना सायकल बक्षी देण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:56 PM 31/Jan/2025