Ratnagiri : अंशकालीन स्त्री परिचरांचे ‘जेल भरो’ आंदोलन

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचर कर्मचाऱ्यांची मानधनवाढ व इतर मागण्यांबाबत शासकीय आदेश विनाविलंब निर्गर्मित करावे, या मागणीसाठी मंगळवारी जिल्हा परिषदेत समोर या महिलांनी जेल भरो आंदोलन केले.

गेली अनेक वर्षे जिल्हा परिषदेच्या उपकेंद्रात अंशकालीन स्त्री परिचर कार्यरत आहेत. मात्र, मानधनवाढीसाठी अनेक वर्षे संघर्ष करत आहेत. मात्र, त्यांना यश येत नाही. त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत आता या महिला आक्रमक झाल्या आहेत. जिल्हा परिषदेवर मंगळवारी मोर्चा काढून जेल भरो आंदोलन करण्यात आले.

किमान वेतन २१ हजार रुपये देण्यात यावे, अंशकालीन नावात बदल करण्यात यावा, महिला परिचारांना प्रसूती रजा मंजूर करावी, प्राथमिक आरोग्य केंद्रात १ पद ज्येष्ठतेनुसार परिचर पदावर घेण्यात यावे.

कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाल्यास सहाय्यता निधी मंजूर करावा, आदी मागण्या या महिलांच्या आहेत. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनाली कांबळे, प्रतिभा आखाडे, अनघा कीर आदी उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 02/Oct/2024