अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा! केंद्र सरकारनं महाराष्ट्राला यंदा तरी न्याय द्यावा : रोहित पवार

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) या आज अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात त्या नेमक्या कोणत्या घोषणा करणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

या अर्थसंकल्पाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचा एक सामान्य नागरिक म्हणून आजपासून सुरु होणाऱ्या केंद्राच्या बजेटकडून माझ्यासहित एकंदरीत महाराष्ट्रालाच मोठ्या अपेक्षा असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा होणाऱ्या कॉर्पोरेट टॅक्समध्ये 40 टक्के, इन्कम टॅक्समध्ये 32 टक्के, GST मध्ये 20 टक्के वाटा असणाऱ्या महाराष्ट्राला निधी देताना खरंच केंद्र सरकारकडून न्याय मिळतो का? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

प्रत्यक्ष कराच्या महाराष्ट्रातून जमा होणाऱ्या 100 रुपयांपैकी महाराष्ट्राला केवळ 7 रुपये परत मिळतात. दुसरीकडं गुजरातला 100 रुपयामागे 32 रुपये मिळतात. तर उत्तर प्रदेशला 333 रुपये मिळत असतील तर हा महाराष्ट्रावर अन्यायच नाही का? असा सवाल देखील रोहित पवार यांनी दिला आहे. हा अन्याय बजेटमधून दूर करणं गरजेचं असताना केंद्र सरकारने मात्र महाराष्ट्राच्या बाबतीत सापत्न भूमिका घेतलीय. किमान यंदा तरी केंद्र सरकार वास्तववादी भूमिका घेऊन महाराष्ट्राला न्याय देईल, ही अपेक्षा असल्याचे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 01-02-2025