चिपळूण : तालुक्यातील गुढे-कोंडवी रस्त्याची अवस्था सध्या बिकट झाली असून हा रस्ता जीवघेणा बनला आहे. रस्त्याच्या डांबरीकरणासाठी येथील ग्रामस्थ शासन, लोकप्रतिनिधींकडे प्रशासनासह सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याने येथील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. रामपूर गुढेफाटा ते मिरवणे मार्गे गुढे-कोंडवी १५ किलोमीटर असलेल्या या रस्त्यावर उमरोली, पाथर्डी, शिरवली, मिरवणे, ओंबळी, ताम्हणमळा, डुगवे आणि गुढे-कोंडवी गावे वसली आहेत. पावसाळ्यात तर एसटीची वाहतूक थांबविण्यात आली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 01/Feb/2025














